महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या आणाभाका

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या आणाभाका

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांना निवडून आणण्याच्या आणाभाका काँग्रेस (Congress) राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांनी आज कोल्हापुरात केल्या.

पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड (Arun Lad) आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज महासैनिक दरबार हॉल येथे प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif),उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant), कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी, पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर हे दोन्ही उमेदवार मताधिक्याने निवडून येतील. शिवसेनेकडून कोणतीही दगाबाजी होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय आता आमचं ठरलय, असं सांगत, 15 वर्षांसाठी महाविकास आघाडीची एकी ही अशीच राहणार असल्याचेही नामदार उदय सामंत यांनी म्हटले.

कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी, महाविकास आघाडीचा हा एकत्र होत असलेला मेळावा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचा दिवस असल्याच त्यांनी सांगितले. विरोधकांच्या कुघोड्या सुरू आहेत. मात्र अरुण लाड आणि जयंत आसगावकर या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांनी विजयाचा चंग बांधवा असं आवाहनही त्यांनी केले.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार पी. एन. पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केल. यावेळी शिक्षक मतदार संघातून उमेवारी माघार घेतल्याबद्दल, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, शिक्षक नेते दादा लाड, विना अनुदानित कृती समितीचे नेते बाबा पाटील, खंडेराव जगदाळे आदींचा सत्कारही करण्यात आला. या मेळाव्यासाठी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवने, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER