भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसला कर्नाटकप्रमाणे प्रत्येक राज्यात आघाडी गरजेची : पी. चिदंबरम

chidambaram

नवी दिल्ली : आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक राज्यात घटक पक्षांसोबत आघाडी करणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस आघाडीला पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना चिदंबरम बोलत होते. इतर राज्यांत याप्रकारच्या आघाड्या झाल्या तरच कर्नाटकासारखे निकाल पाहायला मिळतील, असेही ते म्हणाले.

मात्र चिदंबरम यांना याच अनुषंगो पश्चिम बंगाल येथील आघाडीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाला पद्धतशीरपणे बगल दिली. ते म्हणाले, यासंबंधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निर्णय घेईल.

मोदी सरकारने केलेल्या कुठल्याही घोषणांची अंमलबजावणी झाली नसून निवडणुकीच्या तोंडावर भाजपने परत एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उकरून काढला असल्याचे ते म्हणाले.

कर्नाटक पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल लागला असून यात भाजपचा पराभव झाला. तिथे काँग्रेस-जेडीएस आघाडीला मोठे यश मिळाले आहे. काँग्रेस-जेडीएसने पाच पैकी 2 लोकसभा आणि 2 विधानसभेच्या जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला मात्र एका जागेवर विजय मिळवता आला आहे.