तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित शिकणार तामिळ भाषा

चेन्नई: तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी जगातील सर्वात शास्त्रीय भाषांपैकी एक असणारी तामिळ भाषा शिकणे सुरु केले आहे. इंग्रजी , हिंदी आणि मराठी भाषेच ज्ञान आत्मसात करून आता त्यांनी तामिळ शिकण्याचा निर्णय घेतला आहे. भाषेबद्दलच्या प्रेमामुळे तामिळ शिक्षकांकडून तमिळ भाषेचे धडे घेत आहेत. असे त्यांनी कार्यालयीन भाषेच्या निवेदनात म्हटले आहे.

पुरोहितच्या मते, तामिळ ही एक शास्त्रीय आणि सुंदर भाषा आहे. ही भाषा शिकून तामिळनाडूच्या जनतेला आपण चांगल्याने समजून घेऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. नागपूरचे बनवारीलाल पुरोहित हे तीन वेळा लोकसभेचे सदस्य बनले. यासोबतच पुरोहित हे द हितवाद या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक होते आणि तामिळनाडूच्या राज्यपाल पदी 6 ऑक्टोबरला त्यांची नियुक्ती करण्यात आली