अमित शहांनी पाडले तृणमूल काँग्रेसला खिंडार; आजी-माजी खासदारांसोबत ११ आमदारांचा भाजपात प्रवेश

Amit Shah & Mamta Banrjee

नवी दिल्ली : भाजपाकडून (BJP) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सरकारला जोरदार धक्के देण्यात आले आहेत. आजी-माजी खासदारांसह ११ आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत केंद्रीय मंत्री अमित शहांच्या (Amit Shah) उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे.

गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांनी ममता सरकारमध्ये नाराज असलेल्या आमदार, खासदारांना फोडण्याचा  प्रयत्न केला होता. आज या नाराजांनी अधिकारी यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला. यामध्ये तापसी मोंडल, अशोक दिंडा, सुदीप मुखर्जी, सायकत पंजा, शीलभद्र दत्ता, दीपाली बिश्वास, सुक्र मुंडा, श्यामपदा मुखर्जी, विश्वजित कुंडू आणि बन्सारी मैती यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER