तिवरे धरणफुटीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात

रत्नागिरी/प्रतिनिधी :  चिपळूण येथील तिवरे धरणफुटीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. तिवरे धरण कोणत्या खेकड्याने फोडले, त्याचा चौकशी अहवाल पूर्ण झाला असल्यास जनतेसाठी खुला करण्यात यावा, अशी जाहीर मागणी रत्नागिरी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवजयंती निमित्त मनसे तर्फे ३ हजार झेंड्यांचे वाटप

तिवरे धरण फुटीतील मृतांना न्याय मिळण्यासाठी या दुर्घटनेचे खरे कारण जनतेसमोर येणे आवश्यक आहे. मात्र, सात महिने उलटून गेले तरी अद्याप या प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर आलेला नाही. ज्या भ्रष्ट खेकड्याने तिवरे धरण फोडले, त्याचा चेहरा जनतेसमोर यायलाच हवा, असेही समितीने या निवेदनात नमूद केले आहे. तिवरे धरणफुटीबाबत निवडणुकीनंतर कोणीही जबाबदार लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. खरे तर कोकणातील नागरिकांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधीनी हा विषय शासन दरबारी लावून धरायला हवा होता. मात्र गरीबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती येथेही दिसून येत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. चौकशी अहवाल जनतेसमोर सादर केला गेला नाही तर निषेध आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.