तिरुपती-कोल्हापूर रेल्वे बंद

Train

कोल्हापूर : तिरुपती-कोल्हापूर स्पेशल रेल्वे दि. 15 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने या विशेष गाडीला रेल्वेकडून मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता तिरुपतीकडे जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.कोरोनामुळे देशातील सर्व रेल्वे सेवा ठप्प होती. अनलॉक झाल्यानंतर कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान ही गाडी रेल्वेकडून सुरू करण्यात आली होती. परंतु तिच्या निर्धारित मुदतीच्या 14 दिवस आधीच ही गाडी रेल्वेने बंद केली आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER