तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस सुरू

Express Way

कोल्हापूर :  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस आजपासून सुरू झाली आहे. अनलॉकनंतर देशात टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत. यापूर्वी कोयना, महाराष्ट्र, हुबळी-कुर्ला, यशवंतपूर-निजामुद्दीन, वास्को निजामुद्दीन इत्यादी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आता कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस सुरू होत असल्याने मिरज, हातकणंगले, कोल्हापूर येथील प्रवाशांची सोय होणार आहे. या गाडीला १ प्रथम वातानुकूलित, १ द्वितीय  वातानुकूलित, ३  वातानुकूलित  थ्री टियर, १२ स्लीपर आणि २ द्वितीय श्रेणी सीटिंग कोच जोडण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER