तिरुपती देवस्थान ठेवींवरच्या व्याजातून करणार कर्मचाऱ्यांचे पगार

Tirupati

तिरुपती : देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक – तिरुपती देवस्थानने (Tirupati Devasthan) कोरोनाकाळात (Corona) देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी ठेवींवरील व्याज दरमहिन्याला घेण्याचा निर्णय घेतला. सकाळी तिरुमाला येथे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या मंदिरे बंद असल्याने मंदिरांचे उत्पन्न बंद झाले आहे. मात्र, कोरोनाच्या साथीच्या आधी मंदिरांना दान – दक्षिणेतून रोज उत्पन्न मिळत होते.

श्री वेंकटेश्वर मंदिराच्या ‘हंडी’नंतर, मंदिराच्या सावधी जमावर  (फिक्स डिपॉझिट)  मिळणारे व्याज हे मंदिराचे मोठे उत्पन्न आहे. देवस्थानचे १२ हजार कोटी रुपये वेगवेगळ्या बँकांमध्ये तीन महिने, सहा महिने आणि १२ महिने असे सावधी जमा आहेत. या सर्व ठेवींवरचे व्याज देवस्थान वर्षअखेरी एकदम  घेत असते.

आता मंदिरे बंद असल्याने उत्पन्न बंद आहे.  त्यामुळे देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी देवस्थानाने या ठेवींवरील व्याज तत्काळ प्रभावाने, दरमहिन्याला घेण्याचा निर्णय घेतला. दरमहिन्याला मिळणाऱ्या व्याजातून आम्ही कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकतो तसेच मंदिरातील नियमित विधींचाही खर्च भागवता येईल असे टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. श्री वेंकटेश्वर मंदिरातील हंडीनंतर डिपॉझिटवर मिळणारे व्याज तिरुपती देवस्थानाचे दुसरे सर्वांत मोठे उत्पन्न आहे. भक्त हंडीमध्ये रोख रकमेसह विविध वस्तू-दागिने अर्पण करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER