
कोल्हापूर : इंडिगोच्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेला दि. २२ पासून प्रारंभ होत आहे. तर कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा (Tirupati and Ahmedabad flights )पुन्हा सुरू होत आहे. कोल्हापूर-अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून येत आहे. शनिवारपर्यंत कोल्हापूरहून अहमदाबादला जाण्यासाठी ५५ प्रवाशांनी बुकिंग केले आहे. अहमदाबादवरून कोल्हापूरला येण्यासाठी ४५ प्रवाशांनी बुकिंग केले आहे; पण कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेला थंडा प्रतिसाद दिसून येत आहे. तिरुपतीसाठी फक्त १२ प्रवाशांकडून बुकिंग केले आहे.
अहमदाबाद विमानसेवा सकाळच्या सत्रात आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार, अशी तीन दिवस सुरू राहणार आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात बंद झालेली इंडिगोची कोल्हापूर तिरुपती विमानसेवा दुपारच्या सत्रामध्ये आठवड्यातून सातही दिवस सुरूराहणार आहे. तिरुपती मंदिर अद्यापही पूर्ण खुले झालेले नाही. ऑनलाईन बुकिंगप्रवेश सुरू आहे तसेच ही सेवा दुपारच्या सत्रात सुरू राहणार असल्याने प्रवाशांकडून थंडा प्रतिसाद मिळत आहे, असे जाणकारांकडून बोलले जात आहे.
अहमदाबाद येथून सकाळी ८ वाजता विमान टेकऑफ होईल ते कोल्हापूर विमानतळावर सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी लॅडिंग करेल. ३० मिनिटांच्या विश्रांतीनंतर १० वा. ४५ मिनिटांनी विमान कोल्हापुरातून टेकऑफ होईल ते अहमदाबाद येथे दुपारी १ वाजता लँडिंग करेल.
तिरुपती येथून दररोज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी विमान टेकऑफ होईल ते कोल्हापूर येथे ३ वाजून ५५मिनिटांनी लॅडिंग करेल, तर कोल्हापूर येथून ४ वाजून १५ मिनिटांनी विमान टेकऑफ होईल ते तिरुपती येथे सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटाने विमान लँडिंग करेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला