दुसऱ्यावर सकारात्मक छाप टाकण्यासाठी करा ‘हे’ उपाय

likebility

बऱ्याचदा एखादी अशी व्यक्ती आपल्याला योगायोगाने भेटते आणि ती व्यक्ती आपल्या मनावर साकारात्मात छाप टाकते. त्या व्यक्तीचा स्वभाव आणि विचार आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करतो. जर तुम्हालाही सकारत्मक छाप दुसऱ्यांवर टाकायची असेल तर काही गोष्टी केल्याने आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्याने हे सहज शक्य आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची छाप समोरच्या व्यक्तीवर पाडण्यासाठी काही गोष्टींचा अतिरेक तर आपण करत नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक असते. यामुळेच तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडत असतो, आणि या व्यक्तीशी व्यावसायिक संबंध किंवा वैयक्तिक मैत्री पक्की होण्याची ही सुरुवात ठरू शकते. त्यामुळे हे संबंध कायमस्वरूपी असावेत असे वाटत असल्यास काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे ठरते.

ही बातमी पण वाचा : मुलींना इम्प्रेस करण्याचे ‘हे’ खास टिप्स नक्की वाचा..

समोरच्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटत असाल, तर फार व्यक्तिगत प्रश्न विचारणे किंवा स्वतःबद्दल फार व्यक्तिगत माहिती सांगणे टाळावे. तुम्ही पहिल्याच भेटीत विचारलेल्या फार व्यक्तिगत प्रश्नांनी समोरच्या व्यक्तीला अवघडल्यासारखे वाटू शकते. ओळख जशी वाढत जाईल तशी समोरच्या व्यक्तीबद्दल वैयक्तिक माहिती आपोआप समजत जाते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल सर्वच काही लगेचच जाणून घेण्याचा आणि उत्साहाच्या भरात आपल्याबद्दल सर्व काही सांगण्याचा मोह आवरावा. एखाद्याशी भेट जर कामांच्या निमित्ताने होत असेल, तर त्या वेळी वैयक्तिक प्रश्न विचारणे पूर्णपणे टाळावे.

समोरच्या व्यक्तीशी पहिल्याच भेटीदरम्यान संभाषण करीत असताना स्वतःचीच बढाई करणे टाळावे. एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेले गुण त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येत असतात. त्यामुळे आपल्या गुणांचे मुद्दाम प्रदर्शन करणे किंवा आपली आर्थिक परिस्थिती, कोणा बड्या मंडळींशी आपल्या असणाऱ्या वैयक्तिक ओळखी इत्यादी गोष्टींचे प्रदर्शन करू नये. पहिल्या भेटीतले संभाषण हे समोरच्या व्यक्तीची ओळख करून घेण्यासाठी असते हे समजून घेऊन संभाषणाच्या द्वारे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे संभाषण दुतर्फी असणे महत्वाचे आहे. उत्साहाच्या भरात आपणच बोलत न बसता समोरच्या व्यक्तीलाही बोलण्याची, एखाद्या गोष्टीवर मत प्रदर्शित करण्याची संधी द्यावी. समोरची व्यक्ती काही बोलत असताना तिचे म्हणणे मधेच तोडून न टाकता पूर्ण ऐकून घ्यावे.

ही बातमी पण वाचा : मुलं प्रेमात पडल्यावर असे वागतात

एखाद्या व्यक्तिला प्रथमच भेटायला जाताना तुम्ही कसे दिसता यावरही तुमचा प्रभाव कसा पडणार हे अवलंबून असते. शरीराचे सौंदर्य हे प्रत्येकालाच लाभते असे नाही, मात्र योग्य पेहराव, तुमच्या हालचालीतील सहजता आणि वागण्या-बोलण्यातील आत्मविश्वास या गोष्टींचा पडणारा प्रभाव फार मोठा असतो. आपण परिधान करीत असलेला पोशाख असो, किंवा आपले संभाषण असो, कोणतीही गोष्ट ओढून ताणून करणे टाळायला हवे. तुमचे संभाषण जितके सहज आणि साधे असेल तितका तुमचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर चांगला पडत असतो.