चार चौघात असतानाही ‘ती’ होईल तुमच्याकडे आकर्षित

Girl

बरेचदा एखादी मुलगी एखाद्या मुलाला आवडते पण मित्र-मैत्रिणीच्या घोळक्यात तिला इम्प्रेस कसे करावे ? हा प्रश्न अनेकांना पडतो. अश्या वेळेस नेमके कसे वागावे ? काय करावे ? म्हणजे तिचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल आणि आपल्या मनातल्या भावना तिच्या पर्यंत पोहचविता येतील यासाठी काही खास टिप्स.

ही बातमी पण वाचा : दुसऱ्यावर सकारात्मक छाप टाकण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Action speeks louder then the word अशी म्हण इंग्रजीत प्रचिलित आहे. म्हणजेच तुमचे हावभाव आणि ‘बॉडी लँग्वेज’ तुमच्या शब्दांपेक्षा जास्त प्रभाव दुसऱ्यांवर टाकत असतात. त्यामुळे आपल्या हावभावांवर जाणीवपूर्वक लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. सगळ्यांसोबत असतांनाही तुम्ही तिच्याकडे पाहून रोमँटिक पणे हसले आणि त्याला प्रतिसाद देत तीही तुमच्याकडे पाहून हसली तर समजा की, तिच्या मनात तुम्ही नक्कीच जागा बनवू शकता. म्हणजेच ‘हसी तो फसी’ असे म्हणायला हरकत नाही.

impress girl

बऱ्याचदा मुलं दिसायला जरी चांगले असले तरी त्यांची राहणीमान ही खूपच अजागळ असते. मुलींना असे मुलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे राहणीमान सुधारणे आणि आपल्याला साजेसे कपडे घालणे तिला आकर्षित करण्यासाठी फार महत्वाची भूमिका बजावतात.

मुलींना स्वतःची स्तुती ऐकणे फार आवडत असते. त्यामुळे तिच्या ड्रेसिंग सेन्सची, हेअर स्टाईलची, तिच्या हसण्याची, तिच्या स्वभावाची स्तुती करा. असे केल्याने तुम्ही तिला नोटीस करता हे तिच्या लक्षात येईल. स्तुती करतांना आपण अति स्तुती तर नाही करतोय ना ? याचे भान ठेवा.

मुलांमधला ‘सेन्स ऑफ ह्यूमर’ मुलींना सगळ्यात जास्त आकर्षित करतो. अगदी दिसण्यापेक्षाही जास्त. त्यामुळे तिची थोडी फार थट्टा करण्यास काही हरकत नाही, पण थट्टा करतांना तिचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. नाही तर ‘करायला गेलो काय आणि वरती झाले पाय’ असे व्हायचे.

ही बातमी पण वाचा : मुलींना इम्प्रेस करण्याचे ‘हे’ खास टिप्स नक्की वाचा..

आकर्षित करण्याच्या नादात खोटे बोलणे टाळा. खोटं बोलून तात्पुरते इम्प्रेस करणे सहज शक्य आहे, पण पितळ उघड पडल्यावर तुमची असली नसली अब्रूही धुळीला मिळू शकते. या काही टिप्स वापरल्या तर नक्कीच चार चौघात असतांनाही ती तुमच्याकडे आकर्षित होईल.