मधुचंद्राच्या रात्री टाळा या चुका

marriage

मधुचंद्र हा प्रत्येकासाठी त्याच्या आयुष्यातला सर्वात आनंददायी आणि मधुर क्षण असतो. लग्ना नंतर नवरा बायको मधले प्रेम वाढविण्यामध्ये मधुचंद्राचे विशेष महत्व असते. कारण नवरा बायको मधले एकमेकांप्रतीचे प्रेम आणि विश्वास वाढविण्यासाठी शारीरिक संबंध ही निव असते. वयात असतांना स्त्री असो वा पुरुष दोघेही मधुचंद्रा बद्धल स्वप्न सजवीत असतात. तर बऱ्याच जणांच्या मनात मधुचंद्राच्या बाबतीत भीतीही असते. विशेषतः मुलींची या बाबतीत मानसिक तयारी नसते. त्यामागचे मूळ कारण म्हणजे मधुचंद्राच्या बाबतीत असलेले काही गैरसमज. पण हे गैरसमज लग्नाआधी दूर करने फार आवश्यक असते. लग्न तुमच्या मनानुसार न होता पारंपारिक पद्धतीने म्हणजे अॅरेंज्ड् असेल तर तर छोट्या-छोट्या चिंता मोठ्या वाटू लागतात. हनिमूनबद्दल असलेल्या अफवांमुळे अनेकदा तुमची झोपही उडते. त्यामुळेच मधुचंद्राच्या रात्रीसाठी तज्ज्ञांनी सुचविलेल्या काही टीप्स आम्ही येथे देत आहोत. यामुळे तुम्हाला हनिमून आनंदायी ठरेल.

१) मधुचंद्राच्या रात्री पूर्ण समाधानाची अपेक्षा नको : लग्नापूर्वी आणि लग्नानंतरच्या धावपळीने तुम्ही पूर्णपणे थकलेले असता. मधुचंद्रआपल्या संस्कृतीत तर अनेक रिती-रिवाज असतात. त्यात वर-वधुला मानसिक आणि शारिरीक थकवा येतोच. अशातच एक दोन दिवसात मधुचंद्राची रात्र येते. त्यामुळे कुठलीही घाई न करता आधी एकमेकांशी छान मनमोकळ्या गप्पा मारा. साथीदार थकला असेल तर संयम ठेवा. यानंतर मिळून पुढे जायचं की नाही याचा निर्णय घ्या. पहिल्याच शारिरीक संबंधात दोघेही पूर्ण समाधानी झालात तर आनंदच आहे पण असं झालं नाही तर निराश होऊ नका. आयुष्य खूप मोठं आहे. एका रात्रीचं नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे थोडा वेळ द्या आणि जस-जसे तुमचे संबंध वाढतील तशी तुमची अपेक्षा पूर्ण होत जाईल.

२) स्खलनासाठी दबाव नको : दोघांचीही पहिलीच वेळ असल्याने परस्परांवर ऑर्गेज्म म्हणजे वीर्य स्खलनासाठी लगेचच दबाव टाकणं चुकीच ठरेल. असा दबाव टाकल्याने त्याचा तुमच्या संबंधांवर दूरगामी परिणाम होतील. स्खलन एक दोन दिवसात साध्य होईल असं नाही. एकमेकांबद्दल प्रेम भावना मनात जागृत झाल्यावर किंवा आपल्या साथीदाराच्या तुम्ही जेवढ्या जवळ जाल तितकी स्खलनाची भावना वाढीस लागते. बेडवर एकमेकांना पूरक असे वागा. आपल्या साथीदाराच्या मूडप्रमाणे वागाल तर त्यानुसार दोघांचं मन आणि शरीर आणखी जवळ येईल.

३) ऑर्गेज्मचा खोटा दिखावा नको : आयुष्यभर साथीदारासोबत आपण राहणार असल्याने त्याच्याशी प्रामाणिक रहा तरच तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. स्खलन झाल्यावर फक्त तुमच्या साथीदारालाच नाही तर तुम्हालाही समाधान मिळायला हवे. तुमच्या काय अपेक्षा आहेत. मूड कसा आहे. कुठल्या गोष्टींची उत्सुकता आहे, अशा सर्व गोष्टींची साथीदाराशी चर्चा करा. त्यावर आपल्या साथीदाराचं मन आणि मत जाणून घ्या. त्यामुळे पुढच्या वेळी दोघांपैकी कोणावरही ऑर्गेज्मचा खोटा दिखावा करण्याची वेळ येणार नाही. कारण तुम्ही एकमेकांना पूर्णपणे समजलेले असाल आणि आनंदाचे परमोच्च टोक गाठल्यानंतर आपोआपच तुम्हाला संपूर्ण समाधानाचा अनुभव येईल.

४)  सेक्स संबंधी चर्चासेक्स संबंधी चर्चा करणं गरजेचं नाही : मधुचंद्र किंवा हनिमूनची पहिली रात्र ही तुमच्या वैवाहिक जीवनातील एकमेकांसोबतची पहिली एकांतातील रात्र असते. पण ही रात्र पहिली आणि अखेरची नसते. अशा अनेक रात्री भविष्य तुमच्या जीवनात सुखाचे आणि आनंदाचे क्षण आणतात. त्यामुळे आधी एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करा. आपण पती-पत्नी आहोत हे लक्षात घेऊन एकमेकांच्या समस्या-शंका जाणून घ्या. मनमोकळेपणाने बोला. मनात कुठलंही किंतू-परंतू ठेवू नका. पण सेक्सवर या दिवशी चर्चा न केल्यास पुढील वैवाहिक जीवनात शारिरीक जवळीकतेत सेक्समध्ये अडचणी येतील, तुम्हाला असं वाटत असेल तर ही चिंता मनातू काढून टाका. त्यापेक्षा एकमेकांसोबत आनंद घेण्याचा प्रयत्न करा. सेक्स हे पत्नी-पत्नीतील वैवाहिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे विसरू नका. मधुचंद्राची पहिली रात्र ही एकदाच येते. त्यामुळे ही रात्र सुवर्ण आठवणींनी आपल्या चिरस्मरणात राहिल, असा प्रयत्न करा.

५) सुरूवात कोणीही करावी : हनीमुनच्या पहिल्या रात्री सुरूवात पुरूषानेच करावी, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पण या प्रचलित विचाराने पुरूषावर कधी-कधी विनाकारण दबाव येतो. त्यामुळे आपल्या साथीदाराच्या मनावर दडपण असेल तर पुढाकार घ्या. मनात कुठली अढी ठेवू नका. दोघांमध्ये कुणालाही प्रेम आणि जवळीकतेची जाणीव होईल त्याने यावेळी पुढे यावं. ही जाणीव तुमच्या साथीदाराला तुमच्यातलं प्रेम आणि प्रामाणिकतेची जाणीव करून देईल. यातूनच पहिल्या रात्रीतील फुलांच्या सुगंधाप्रमाणे तुमचं जीवन कायम दरवळत राहील.

वरील सर्व टिप्स तुमचा मधुचंद्र अधिक आनंददायी आणि विस्मरणीय बनविण्यासाठी तुमच्या कमी येईल. यामुळे तुमच्या आयुष्यातील पुढचा प्रवास अधिक सुखकर होईल हे नक्की.