नात्यात गोडवा टिकवून ठेवायचा असेल तर या चुका टाळा !

Couple-Reconcile

प्रत्येक व्यक्तीचे आपल्या पार्टनर सोबतचे नाते हे वेगवेगळे असते. रिलेशनशिप मध्ये असतांना बऱ्याचदा कळत नकळत काही गोष्टी अश्या घडतात की त्यामुळे नात्यातला गोडवा हळू हळू कमी व्हायला लागतो. नात्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेतली आणि काही चुका टाळल्या तर नात्यातला गोडवा चिरकाळ टिकून राहण्यास मदत मिळते.
जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी.

रिलेशनशिपमधून काय हवंय?

सर्वातआधी तर तुम्हाला या नात्यातून काय हवंय हे हे स्पष्ट असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये डेटींगमध्येच हे स्पष्ट होतं की, तरुण-तरुणी कपल होणार की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, डेटला तुम्ही पार्टनर नाही करु शकत तर जबरदस्तीने ते नातं लांबवण्याची गरज नाहीये. कारण याचा त्रास दोघांनाही होतो.

नात्यात गोडवाशारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती नसावी

काहींच्या नात्यामध्ये सेक्स इमोशन्स इतकाच महत्वाचा बनतो. पण हेही विसरू नये की, फिजिकल रिलेशन हे जबरदस्तीने ठेवू नये. दोघांचीही इच्छा असेल तरच यात पडावं. कारण जबरदस्तीने यात पडाल तर तुम्हाला स्ट्रेसशिवाय काही मिळणार नाही. सोबतच तुमच्या नात्याची विश्वासार्हताही कमी होईल.

विनाकारण अपेक्षा

अपेक्षा असणं चांगली गोष्ट आहे. पण वाईट गोष्टींची किंवा नको त्या गोष्टींच्या अपेक्षा ठेवल्या तर नातं तुटू शकतं. म्हणजे दोघांना एकमेकांच्या गोष्टी माहीत असाव्यात. पण त्याची बळजबरी असू नये. हेच का नाही सांगितलं तेच का नाही सांगितलं हे नसावं. जे आहे ते स्पष्ट असावं उगाच खोट्या अपेक्षा ठेवून तुम्ही त्रास करुन घेऊ शकता.

चुकीच्या व्यक्तीला दूर करा

अनेकदा खूप वेळाने काही लोकांना याची जाणिव होते की, त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी योग्य नाहीये. जर तुम्ही या नात्यामुळे स्ट्रेसमध्ये असाल आणि अजिबात आनंदी नसाल तर हे नातं तिथेच थांबवलेलं योग्य ठरेल. वेळीच योग्य तो निर्णय घेऊन मोकळे व्हा.