डॉक्टरांच्या बिला सह उपचाराचेही ऑडिट करण्याची वेळ : जयंत पाटील

Jayant Patil

सांगली : कोरोना (Corona) रुग्णालय वाढली आहेत. बेडची संख्या वाढली आहे. मात्र मृत्यू दर का कमी होत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर डॉक्टरांनी विचार करण्याची गरज आहे. डॉक्टरांकडून रुग्णांना भरमासाठ बिले येत आहेत. सांगलीसह जिल्ह्यातील वाढता मृत्यूदर चिंताजनक आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या बिलाबरोबर उपचाराचेही ऑडिट करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

दक्षिण भारत जैन सभेच्या डॉ. कर्मवीर आरोग्य अभियानअंतर्गत चोपडे चॉरिटेबल ट्रस्टतर्फे येथे सुरु केलेल्या कोरोना रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, खासदार सजंय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आदि उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, कोरोना रुग्णावरील उपचाराची भरमसाठ बिले येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अनेकजण उपचाराठी पुढे येत नाहीत. उशिरा निदान झाल्याने उपचार करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे मृत्यू दर वाढतात की काय अशी शंका उपस्थित होत आहे. डॉक्टरांच्या कामाबाबत शंका नाही. मात्र काही रुग्णालयात डॉक्टर बाहेर आणि केवळ नर्सकडून तपासणी करणे हे चुकीचे आहे. डॉक्टरांच्याकडून सकाळ-संध्याकाळ पेशंटचे राऊंड झाले पाहिजेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER