‘बार मालकांसाठी वेळ मिळाला, आता मराठा समाजाकडेही थोडं लक्ष घाला’, भाजपचा पवारांना टोला

Sharad Pawar - Atul Bhatkhalkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर काही दिवसांपूर्वीच तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांची विश्रांती घेऊन पवारांनी घरातूनच कामकाजाला सुरूवात केली आहे. आज पुन्हा एकदा ते राजकारण आणि आपल्या दैनंदिन कामकाजात सक्रिय झाल्याचं बघायला मिळालं. कोरोना (Corona) संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी हॉटेल मालकांच्या काही मागण्या नमूद केल्या आहेत. त्यानंतर पवारांच्या या पत्रावरुन भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

‘माननीय पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो’, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘मा. शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय’, असं ट्वीटही भातखळकर यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button