दोन बछड्यांसह वाघीण दिसल्याने खळबळ

एमटी ब्यूरो

अकोला: आकोट तालुक्यातील शिवपूर येथे शेतशिवारात काही मजुरांना व्याघ्र दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाघ पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली तर वन विभागाचे अधिकारीही कामाला लागले आहेत.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवपूर येथील शेतामध्ये काम करीत असताना काही मजुरांना सकाळी दोन बछड्यांसह वाघीण दिसली. ही माहिती गावात पसरताच आजुबाजुच्या गावातील नागरीकही शेतशिवारात दाखल झाले. या वाघीणीने काल दोन बछड्यांना जन्म दिल्याचे काहींचे म्हणणे आहे.