टायगरच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत झाला ब्रेकअप

Krishna Shroff

प्रख्यात अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची (Tiger Shroff) बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. गेल्या एक वर्षात तिने ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेंड एबन हायम्ससोबत अनेक पोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात अगदी ते दोघे एकमेकांचे चुंबन घेण्यापासून ते स्वीमिंग कॉस्ट्यूमवर धमाल करीत असतानाच्या फोटोंचा समावेश आहे. मात्र आता या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. स्वतः कृष्णा श्रॉफनेच सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.

खरे तर या दोघांचे फोटो बघून या दोघांनी लग्न केल्याच्या चर्चाही होत्या. गेल्या एक दीड वर्षांपासून एबन मुंबईतच राहात होता. कृष्णा त्याच्याशी डेटिंग करीत होती. या दोघांना लग्नाबाबत विचारले असता, लवकरच आम्ही लग्न करू असे कृष्णाने म्हटले होते. त्यामुळे हे दोघे लवकरच लग्न करणार असे म्हटले जात असतानाच आता दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली आहे.

कृष्णाने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपची माहिती देताना लिहिले आहे, माझे सर्व प्रशंसक खूपच चांगले आहेत. परंतु आता यापुढे मला एबन हायम्ससोबत टॅग करणे बंद करा. आता आम्ही दोघे एकत्र राहात नाही त्यामुळे आम्हा दोघांना एकत्र जोडणे बंद करा. सभी फैन क्लब बहुत प्यारे हैं, लेकिन मुझे एबन हायम्स के साथ टैग करना बंद करें। हम .धन्यवाद. यासोबतच कृष्णाने तिचे आणि एबनचे सोशल मीडियावरील सर्व फोटो डिलीट केले असून दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले आहे. एबन ऑस्ट्रेलियाला परत गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER