टायगर श्रॉफ आता बनणार बॉक्सर ‘गणपत’

Tiger Shroff

या वर्षी जे काही मोजके चित्रपट प्रदर्शित झाले त्यात टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) ‘बागी-३’ चा समावेश आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. नाही तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम नक्कीच केला असता. या चित्रपटाच्या यशानंतर ‘बागी-३’ चा दिग्दर्शक अहमद खान (जो एक चांगला नृत्य दिग्दर्शकही आहे) याने ‘हीरोपंती-२’ ची घोषणा केली होती.

या दरम्यानच प्रख्यात दिग्दर्शक विकास बहलने टायगर श्रॉफला आपल्या नव्या चित्रपटासाठी साईन केल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट बॉक्सरच्या जीवनावर आधारित असून टायगर श्रॉफ यात बॉक्सरची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे नाव ‘गणपत’ ठेवण्यात आले असून हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे.

चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू करण्यात आले आहे. टायगरला कुस्ती आणि बॉक्सिंगची आवड असून या विषयावर आधारित चित्रपटात काम करण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळेच विकास बहलने त्याला ‘गणपत’ची कथा ऐकवताच त्याने लगेचच होकार दिला. चित्रपटातील गणपत हा गणपतीचा भक्त असतो. स्वतः टायगरही गणपतीचा भक्त असल्याने ही भूमिका साकारण्यास तो खूपच उत्सुक आहे. चित्रपट साईन केल्यानंतर लगेचच टायगरने बॉक्सिंगच्या प्रॅक्टिसला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. पुढील वर्षी परदेशात चित्रपटाचे शूटिंग केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER