टायगर श्रॉफ बनणार ‘खलनायक?’

Sanjay Dutt - Khalnayak - Tiger Shroff

बॉलिवुडमध्ये (Bollywood) राज कपूर यांच्यानंतर शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी 1993 मध्ये संजय दत्तला खलनायक बनवून ‘खलनायक’ नावानेच चित्रपट तयार केला होता. संजय दत्तसोबत या चित्रपटात इन्स्पेक्टरच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि नायिकेच्या रुपात माधुरी दीक्षित दिसली होती. या चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे चित्रपटाप्रमाणेच प्रचंड लोकप्रिय झाले होते. सुभाष घई अधे-मधे खलनायकच्या सिक्वेलबाबत बोलत असे पण सिक्वेल काही बनला नाही. मात्र आता खलनायकचा सिक्वेल बनण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे या सिक्वेलचे कथानक संजय दत्त (Sanjay Dutt) यानेच सुभाष घई (Subhash Ghai) यांना सांगितले असून त्यांनासुद्धा कथानक आवडले आहे. आणखी विशेष महत्वाचे म्हणजे सिक्वेलमध्ये खलनायक म्हणून टायगर श्रॉफला (Tiger Shroff) पडद्यावर आणण्याचे घाटत आहे.

‘खलनायक’ चित्रपटाच्या शेवटी इन्स्पेक्टर जॅकी श्रॉफ संजय दत्तला पकडतो आणि तुरुंगात टाकतो. त्यानंतर सिक्वेलची कथा सुरु होते. संजय दत्तच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय दत्तच्या मनात एक कथानक आकार घेत होते. कथानकावर विचार करताना त्यावर खलनायकचा सिक्वेल बनू शकतो असे त्याला जाणवले आणि त्याने सुभाष घईला कथानक ऐकवले. सुभाष घईला कथा खूप आवडली असून लवकरच हे दोघे या सिक्वेलबबत सविस्तर चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत. सुभाष घई यांना कथानक आवडले असले तरी या सिक्वेलचे दिग्दर्शन स्वतः न करता दुसऱ्या दिग्दर्शकाकडे याची जबाबदारी सोपवण्याचा त्यांचा विचार आहे. संजय दत्तने टायगर श्रॉफचा ऋतिक रोशनसोबतचा वॉर चित्रपट पाहिला. या चित्रपटात टायगर श्रॉफने खलनायकाची भूमिका साकारली होती. ती पाहूनच संजय दत्तच्या डोक्यात टायगर श्रॉफला खलनायकच्या सिक्वेलमध्ये घ्यावेसे वाटले. या सिक्वेलमध्ये जॅकी श्रॉफसाठी कोणतीही भूमिका नाही. मात्र टायगर श्रॉफ ‘खलनायक’ म्हणून पडद्यावर येऊ शकतो. टायगरचा ‘खलनायक’ अनेक ट्विस्टस घेऊन येणार आहे. माधुरी दीक्षित पाहुणी कलाकार म्हणून चित्रपटात दिसेल असेही सांगण्यात येत आहे. चित्रपटाची योजना तयार झाल्यानंतर नायिकेची निवड केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER