टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है! खडसेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोमणा

Devendra Fadnavis - Eknath Khadse - Jayant Patil

मुंबई : भाजपाचा (BJP) राजीनामा देणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पक्षात प्रवेश देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना टोमन मारला – टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है!

जयंत पाटील म्हणालेत – जे टीव्हीवर हा कार्यक्रम पाहात असतील त्यांना आता कळले असेल की ‘टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है’. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, भाजपाचा राजीनामा देतांना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता की, फडणवीस यांनी माझा छळ केला. त्यामुळे मी पक्ष सोडतो आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे म्हणालेत, जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER