उमरेड-कऱ्हांडाल्यात वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले, विषप्रयोग केल्याचा संशय

Umred Pauni Karhandla Wildlife Sanctuary

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात एक वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळल्यामुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. शेजारीच गायीचे वासरुसुद्धा मृतावस्थेत आढळल्यामुळे वाघिणीवर विषप्रयोग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा विषप्रयोग तीन ते चार दिवसांपूर्वी केला असावा असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, विषप्रयोगाच्या आरोपाखाली एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला-पवनी (Umred-Karhandla-Pawani) अभयारण्यात वाघांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. या परिसरात शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. याच अभयारण्यात कॉलरवाल्या वाघिणीचा मृतदेह आढळून आला. तसेच, तिचे दोन्ही बछडेसुद्धा तिच्यासोबत मृतावस्थेत आढळले. ज्या ठिकाणी वाघिणींचा मृतदेह आढळला त्या परिसरात शेती असलेल्या शेतमालकाला अटक करण्यात आली आहे. विषप्रयोग झाल्याची शक्यता लक्षात घेऊन वनाधिकारी आणि पोलिसांकूडन या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची तपासणी सखोलपणे आणि जलदगतीने व्हावी अशी मागणी प्राणीप्रेमींकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER