नागपूरमध्ये खदानीत बुडून वाघाचा मृत्यू

tiger dies by drowned-ramtek nagpur

नागपूर: रामटेक वनक्षेत्रात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. मानेगाव बिट संरक्षित क्षेत्र परिसरातील बिहाडा खदानीत वाघ मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसला. घसरून खदानीतील पाण्यात पडून वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

रामटेक वन परिक्षेत्रातील मानेगाव बिट संरक्षित वनकक्षातील बिहाडी खाणीत वाघ मृतावस्थेत तरंगत असल्याचे वनसंरक्षक संदीप गिरी यांना माहिती मिळाली. यानंतर वन अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. हा वाघ 55 फूट खोल असलेल्या खाणीत पडला होता. हा भाग खडकाळ असल्याने अंदाज न आल्याने तो खाणीत पडला असावा. तसेच खाणीत पाणी असल्याचे त्याचा मृत्यू झाला. याबाबत शवविच्छेदनानंतर अधिकृतपणे माहिती समजेल, असे वन अधिका-यांनी सांगितले.