… वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची : संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोमणा

Sanjay Raut - Chandrakant Patil.jpg

नाशिक : वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पाटलांचा हा संधीचा संकेत धुडकावताना शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत म्हणालेत – वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची?(Sanjay Raut scolds Chandrakant Patil).

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या भेटीसंदर्भात काल पुण्यात चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहोत.

पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणालेत – वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button