
हा व्हिडीओ कुठला आहे हे माहीत नाही; पण यातले दृश्य एखाद्या थरारक चित्रपटातील दृश्यासारखे आहे. गवतासारखे काहीतरी भरलेला एक पेटता ट्र्क गावातून सुसाट धावत जातो. गावातील अनेकांनी याचा व्हिडीओ शूट केला. रेक्स चॅपमन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ही घटना कुठेतरी खरेच घडली आहे.
धावत्या ट्रकला आग लागल्याचे दिसते आहे. तरी ड्रायव्हरने ट्रक थांबवला नाही. रस्त्यावर उभे असलेले लोक व्हिडीओ शूट करू लागले. या ट्रकचे पुढे काय झाले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही आहे. मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, हेसुद्धा कळू शकले नाही आहे. २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
2020, y’all… pic.twitter.com/FDoI4kbXIa
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) May 27, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला