महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन; विजय वडेट्टीवारांचे संकेत

Vijay Vadettiwar

मुंबई :- राज्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढण्याबरोबर मृत्यूंच्याही आकड्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची (Corona Virus) परिस्थिती हाताबाहेर गेल्याने महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन (Corona Lockdown) होऊ शकतो, असे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

मात्र, कोणत्याच उपायाला यश नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा आहे, असे सूतोवाच विजय वडेट्टीवार यांनी केले. अशातच केंद्र सरकार महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहे. लसींचा तुटवडा निर्माण होऊनही पुरवठा केला जात नाही. याउलट गुजरातला जास्त लसी देण्यात आल्या. त्यामुळे आता नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विनंती करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्याचबरोबर वडेट्टीवार यांनी लोकल ट्रेनच्या प्रवासावर पुन्हा निर्बंध आणण्याची शक्यता दाखविली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी कोणती नवी घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. १० दिवसांमध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा १० लाखांपर्यंत पोहचू शकतो. सद्य:स्थितीला लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांनी यावरून राजकारण करू नये. गेल्या महिन्यात MPSCची परीक्षा रद्द झाली. तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. यावेळीही भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button