अंबाबाई मंदिरासह तीन हजार मंदिरे खुली : भाविकांची गर्दी

Ambabai Temple Open

कोल्हापूर : आज सकाळपासून अंबाबाई मंदिरात (Ambabai temple) पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. जिल्ह्यातील तीन हजार मंदिरात दर्शनाची सोय झाली, त्यामुळे पुन्हा एकदा भाविकांच्या गर्दीने कोल्हापूर फुलले असल्याचे चित्र आहे. करवीर निवासिनी अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबा ही दोन प्रमुख मंदिरे शासन निर्णयानुसार आज सकाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी देवदर्शनाची ओढीने भाविकांनी गर्दी केली होती.सकाळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी वाढत आहे.

दरम्यान, पहाटेच मंदिरात निर्जंतुकीकरण, स्वच्छता मोहीम रबवण्यात आली. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या नियमावलीचे काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. दिवाळीच्या सुट्टीत हजारो भाविक येण्याची शक्यता असली तरी दररोज दोन ते तीन हजार भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार असून पाच फुटांचे सामाजिक अंतर ठेवले जात आहे. याशिवाय देवस्थान समिती अंतर्गत ३०४२ मंदिरात सुद्धा भाविकांना दर्शनाची सोय केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER