विनापरवानगी देशी दारूची विक्री करणाऱ्या तिघा जणांवर कारवाई

औरंगाबाद : अवैधरित्या विनापरवानगी देशी दारुची चोरटी विक्री करणाऱ्या दिनकर विश्वनाथ थोरात (वय ४२, रा. जाधववाडी), सुनिल रामभाऊ डुकळे (वय ३२, बजरंग नगर, वडारवाडा) व एका महिलेला गस्तीवरील पोलिसांनी २१ जानेवारी रोजी पकडले. थोरात याच्याकडून १ हजार ४० रुपये किंमतीच्या २० देशी दारुच्या बाटल्या, डुकळे याच्याकडून २ हजार १३२ रुपये किंमतीच्या ४१ देशी दारुच्या बाटल्या तर महिलेकडून ३१२ रुपये किंमतीच्या सहा देशी दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अनुक्रमे सिडको, मुकुंदवाडी व सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.