…म्हणून ग्रहणकाळात पालकांनी आपल्या मुलांना जमिनीत पुरले

Bangolre

आज कंकणाकृती ग्रहण देशभरात विविध ठिकाणी दिसले. ग्रहण म्हणजे अवकाशात सावल्यांचा खेळ असतो. एवढे साधे गणित असतानाही एकविसाव्या शतकातील भारत अद्यापही जुन्या अंधश्रद्धांनाच कवटाळून बसला आहे. एकीकडे भारत चंद्रावर भरारी घेतोय तर दुसरीकडे याच भारतात अघोरी विद्येचाही पुरस्कार करताना लोक दिसतात.

आज सकाळी झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण देशातील बहुतांश भागातून दिसले. खगोलप्रेमींसोबतच सर्वसामान्यांनीही एक खगोलीय घटना म्हणून हे ग्रहण पाहिले. मात्र ग्रहणकाळात अनेक ठिकाणी काही कालबाह्य प्रथा-परंपरा पाळल्याचेही दिसून आले. ग्रहणकाळात असाच एक धक्कादायक प्रकार कर्नाटकमध्ये दिसून आला.

शहरात काही भागात नागरीकांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यामधील ताजसुल्तानपूर गावात आज तीन ‘विशेष’ मुलांना गळ्यापर्यंत जमिनीत पुरण्यात आले. ग्रहणकाळात अशा विशेष मुलांना जमिनीत पुरून ठेवल्यास त्यांच्यामधील व्यंग दूर होते, या समजुतीमधून या मुलांच्या पालकांनी हे कृत्य केले.