पहारेकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून ३ कैदी पळाले

Prisoner

जळगाव : जळगाव जिल्हा उपकारागृहातून शनिवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तीन कैदी पहारेकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून ‘सिने स्टाईल’ फरार झालेत. या घटनेने कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

प्रवेश द्वारावरच्या सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत आणि त्यांच्याशी झटापटकरून तीन आरोपींनी चक्क मुख्य प्रवेश द्वारातूनच पलायन केले.हे कैदी मुख्य प्रवेशद्वारच्या तुरूगरंक्षकाच्या कार्यालयात गेलेच कसे? त्यांच्याकडे पिस्तुल आले कसे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरातच्या स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीचालक आणि तीन कैदी कैद झाले आहेत.

पलायन केलेल्या आरोपींत एक खुनातील तर दोन जण दरोड्यातील असल्याचे कळते. पुणे येथील सराफ व्यापाऱ्याच्या पेढीवर सशस्त्र दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी सुशील मगरे हा पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी असल्याची माहिती आहे. सुशील मगरे, गौरव पाटील आणि सागर पाटील हे तीन आरोपी फरार झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारागृहाला भेट देऊन कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER