अपघातात अंजनगाव सुर्जीच्या दांपत्यासह तिघांचा मृत्यू

Accident

अमरावती : नागपूरहून अंजनगाव सुर्जीला परतणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वृध्द दाम्पत्य आणि करचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात सुरेश भीमराव यावले (६३), शीला सुरेश यावले (६०) हे दाम्पत्य तसेच वाहनचालक दीपक नळकांडे हे तिघे जागीच ठार झाले.

शीला येवले यांची बुधवारी सकाळी नागपूर येथे डोळ्यांची शस्त्रक्रिया होती.ती आटोपून हे कुटुंब नागपूरहून निघाले असताना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास परतवाडा अंजनगाव सुर्जी दरम्यान अपघात झाला. या अपघातात जेवले यांचा मुलगा शुभम जखमी झाला असून त्याला अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे कुटुंब अंजनगाव सुर्जीचे रहिवासी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER