तीन तिघाडा अन् काम बिघाडा! या तीन प्रकरणामुळे आघाडीची प्रतिमा बिघडली!

Dhananjay Munde - Sanjay Rathod

टीकटॉकस्टार पुजा चव्हाणनं पुण्यात आत्महत्या केली. यानंतर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळं वनमंत्री संजय राठोडांना (Sanjay Rathod) आरोपीच्या पिंजऱ्यात उपस्थीत करण्यात आलंय. याप्रकरणी भाजपच्या (BJP) महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी घटनास्थळी भेट देऊन नंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सुरु असलेल्या चौकशीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टिकेची झोड उठवली.

महिन्याभरा पूर्वी रेणू शर्माने (Renu Sharma) राष्ट्रवादीचे (NCP) नेते, समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप दाखल केले होते. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार बनवलं पण अनैतिक संबंधांच्या आरोपामुळं जनमानसातील महाविकास आघाडीची प्रतिमा मलिन होईल की काय? असा प्रश्न उपस्थीत होतोय. महाविकास आघाडीच्या या तीन मंत्री आणि नेत्यांवर लैंगिक शोषण, बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप झालेत. ज्यामुळं आगामी काळात महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो.

१. संजय राठोडांवर पुजा चव्हाणला (Pooja Chavan) आत्महत्येस प्रोत्साहित केल्याचा होतोय आरोप

पुजा चव्हाण या २२ वर्षाच्या मलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून ७ फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. पुजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात राहात होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी मंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती.

भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यातच पूजा चव्हाण आणि मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या होत्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

संजय राठोडांची प्रतिक्रिया

दरम्यान हे प्रकरण समोर आल्यापासून संजय राठोड १५ दिवस माध्यमांपासून दूर होते. याबद्दल कोणतेच स्पष्टीकर द्यायला ते तयार नव्हते. या घटनेनंतर ते माध्यमांसमोर आले पण त्याआधी वाशिममधल्या पोहरादेवी या बंजारा समाजाच्या श्रद्धास्थळी जावून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. लाखोंची गर्दीही जमवली होती.

या घटनेरव स्पष्टीकरण देताना राठोड म्हणाले होते, “गेल्या 30 वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरू आहे. माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल.”

दरम्यान या प्रकरणाचा पोलिस तपास सुरु आहे. तपासाअंती हाती आलेल्या माहितीवरुनच कारवाईचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

२, धनंजय मुंडेंवर लैंगिक शोषणाचा रेणू शर्मान केला होता आरोप

जानेवारी महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या बॉलिवूड गायिकेने गंभीर आरोप केले होते. त्या १७ वर्षाच्या असल्यापासून धनंजय मुंडे यांनी तिच्यासोबत जबरदस्ती केल्याची तक्रार तिन नोंदवली होती. रेणू शर्मा यांनी अनेक हिंदी चित्रपटात गाणी गायली असून बॉलीवूडमध्ये संधी मिळवून देईल असं सांगत धनंजय मुंडे यांनी तिच्यावर लैंगित अत्याचार केल्याचं तिने कबूल केलं होत.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या महिलने ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याची तक्रार ११ जानेवारीला मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली होती.

धनंजय मुंडे यांचे काय होते स्पष्टीकरण

करुणा शर्मा या महिलेसोबत २००३ पासून आपले परस्पर सहमतीने संबंध होते. ही बाब माझे कुटुंबिय, पत्नी व मित्रपरिवाराला माहित होती. परस्परसहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले झाली. सदर मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यावरही माझे नाव आहे. ही मुले माझ्यासोबत राहतात, करुणा शर्मा ही महिला या मुलांची आई असल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे, अशी कबुली धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर दिली होती.

रेणू शर्मा यांनी तक्रार घेतली मागं

धनंजय मुंडें यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्माने नंतर काही दिवसांनी ही तक्रार मागे घेतली. यावेळी तिनं एक भावनिक पत्रही सोशल मिडीयावरुन व्हायरल केल होत. तक्रारदार रेणू शर्मावर नंतर इतर काही जणांनी ब्लॅकमेलिंग करुन ती पैसा उकळत असल्याचे आरोप केले होते. यावर ही तिनं या पत्रात उत्तर देत “विरोधकांनी हा मुद्दा उचलल्यामुळं मी राजकीय षडयंत्राचा बळी ठरत असल्याने माझी तक्रार मागे घेत आहे.” असं लिहलं होतं.

जंगी स्वागतामुळं धनंजय मुंडे पुन्हा सापडले वादात

धनंजय मुंडेंवरील आरोप मागे घेतल्यानंतर त्यांची पाठराखण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादेत आणि बीडमध्ये त्यांच जंगी स्वागत केल. क्रेनच्या सहाय्याने हार भला मोठा हार घालून त्यांच औरंगाबादेत स्वागत करण्यात आलं तर बीडमध्ये अशाच पद्धतीन त्यांच जंगी स्वागत करण्यात आलं.

“धनंजय मुंडे यांचा सत्कार करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का? त्यांचा जंगी सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे,” अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली होती.

३.राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचे पोलिसावर लैंगिक छळाचे आरोप

तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यानं शहराध्यक्षांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. या महिला पदाधिकाऱ्यावर एका पोलिसाने बलात्कार केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

पोलिस ठाण्यात ही युवती गुन्हा नोंदवायला गेली असता तक्रार मागे घेण्याचा दबाव शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी टाकला. गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी २५ लाखांचे आमिष दिल्याची तक्रार या युवतीनं थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेकडे केलीये.

या प्रकरणी सुप्रिया सुळेंची मुंबईत भेट घेऊन या युवतीनं बाजू मांडलीये. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी आरोपाचे खंडन करत युवतीला पदावरुन काढलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER