सांगली जिल्ह्यात सोमवारी नवीन तीन रुग्ण कोरोणाबाधित ;जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

Corona virus

सांगली : सांगली जिल्ह्यात सोमवारी तीन रुग्ण कोरोनाबाधित झाले असून यामध्ये झोळंबी (आष्टा) तालुका वाळवा येथील दि. 23 मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची पत्नी (वय 25वर्ष) कोरोना बाधित झाली आहे. कामत (खरसुंडी जवळ)तालुका आटपाडी येथील 65 पुरूष दि. 23 मे रोजी मुंबईहून आलेले होते. सदरची व्यक्ती कोरोनाबाधित ठरली आहे. कुंडलवाडी तालुका वाळवा येथील संस्थात्मक अलगीकरणात असलेला व दि. 15 मे रोजी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचे वडील (वय 57 वर्ष ) कोरोना बाधित झाले आहेत .

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत उपचाराखाली 36 रुग्ण असून आतापर्यंत 47 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत . दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत 85 रुग्ण पॉझिटिव्ह ठरले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे.तर आज एक रुग्ण कोरोणा मुक्त झाला आहे.

नागोळे येथील 48 वर्षाचा पुरुष , मोहरे तालुका शिराळा येथील 50 वर्षाचा पुरुष, खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षाचा पुरुष व धारावी ते मालगाव येथे बसने आलेल्यां मधील 75 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण अतिदक्षता विभागात विशेष उपचाराखली आहेत. दि. 19 मे रोजी मुंबईहून आलेली 87 वर्षीय महिला अतिदक्षता विभागात उपचाराखली असून तिचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे . कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये बलवडी येथील 55 वर्षाचा पुरुष असून आयसोलेशन विभागात उपचाराखली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER