ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी डिसले गुरुजींसह भारतातील अजून तीन शिक्षकांची निवड

सोलापूर : जगातील सर्वोत्तम ५० शिक्षकांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या नामांकन यादीत सोलापूरच्या डिसले गुरुजींसह (Ranjitsinh disale ) भारतातील अजून तीन शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ‘ग्लोबल टीचर प्राइज’ (Global Teacher Award) ओळखले जाते. १० लाख अमेरिकन डॉलर असे त्याचे स्वरूप आहे. लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅन्ड स्किल फोरम या कार्यक्रमात निवड झालेल्या शिक्षकांना पुरस्कार दिला जाणार आहे. अवघ्या देशभरातून सोलापूरचे रणजितसिंह डिसले यांच्यासह विनिता गर्ग (नवी दिल्ली) व शिवजित पायने (राजस्थान) या तिघा शिक्षकांना या पुरस्कारासाठी मानांकन मिळाले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) शाळेत मागील ११ वर्षांपासून रणजितसिंह डिसले गुरुजी हे शैक्षणिक तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगामुळे जगभर ओळखले जातात. त्यांनी तयार केलेली ‘क्यूआर कोड’ शैक्षणिक पाठ्यपुस्तके सध्या ११ देशांतील १० कोटींपेक्षा जास्त मुले वापरत आहेत. ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून डिसले गुरुजी दीडशेपेक्षा जास्त देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER