वायुदलाच्या ताफ्यात येणार आणखी तीन ‘राफेल’

Rafael

दिल्ली : भारतीय वायुदलाच्या (Indian Air Force) ताफ्यात आणखी तीन राफेल (Rafael) विमाने दाखल होणार आहेत. बुधवारी संध्याकाळपर्यंत ही विमान वायुदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली असतील. बुधवारी सकाळी फ्रान्सहून ती उड्डाण करतील आणि संध्याकाळपर्यंत भारतात पोहचतील असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी एएनआयाला सांगितले. यामुळे भारतीय वायुदलाचे बळ वाढणार आहे. भारताने फ्रान्सला ३६ राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे.

त्यातील पाच विमाने २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली. फ्रान्स ते भारत या प्रवासात अबुधाबीमधील अल धाफ्रा येथील एअर बेसवर ही विमाने एक दिवस थांबली होती. १० सप्टेंबरला राफेल विमाने औपचारिकरीत्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली. आता भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आणखी तीन विमाने येणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER