सांगली जिल्ह्यात तीन लाख पशुधन धोक्यात

पशुधन

सांगली : गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील पशुधनाच्या देखभालीसाठी वैद्यकीय अधिकार्यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी तीन शेतकऱ्यांचे पशुधन धोक्‍यात येण्याची चिंन्हे दिसू लागली आहेत. जनावरांच्यावर उपचार करणारे डॉक्‍टरच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सप्टेंबर – ऑक्‍टोबर महिन्यात लाळ खुरकत या आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून करण्यात येणारे लसीकरण होणार की नाही या काळजीने शेतकरी चिंतेचे आहेत.

मार्चच्या शेवटच्या आठवड्या पासून कोरोना विषाणूची लागण सुरू झालेली आहे. परंतु या परिस्थितीत सुद्धा पशुसंवर्धन विभागा मधील पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी हे जनावरांच्या वरती उपचार करीत आहेत. प्रशासनाने त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण किट दिलेले नाही.तरीसुद्धा बिना संरक्षण किटचे हे डॉक्‍टर आपले काम बजावत होते. त्यांचा प्रत्येक घराशी संबंध येत आहे. त्यामुळे त्यांच्यातील दोन डॉक्‍टरांना कोरोना विष्णूची लागण झाली आहे. त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. काही ठिकाणी शेतकरी सुद्धा कोरोनाच्या भीतीने पशुवैद्यकाना तुमचे तुमीच लसीकरण करा, जवळ येऊ नका अशा प्रकारे पशुवैद्यकाला तुच्छ वागणूक देत आहेत. पाळीव जनावरांना वर्षातून एकदा प्रतिबंधक उपाय म्हणून शासनामार्फत घटसर्प , बुलकांडी, फऱ्या, लाळ खुरकत,या आजारा करिता लसीकरण केले जाते. हे विषाणू जन्य आजार जनावरांना खूप घातक आहेत.त्यावर लसीकरण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER