ग्रँड स्लॅम टेनीसच्या पात्रतेत पहिल्यांदाच तीन भारतीय महिला

Ankita Raina - Karman Kaur Thandi - Pranjala Yadlapalli

नवीन वर्षात भारतीय टेनिससाठी (Indian Tennis) चांगली खबर आहे. पहिल्यांदाच तीन भारतीय महिला टेनिसपटू ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळणार आहेत. वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open) महिला एकेरी मेन ड्रॉसाठी पात्र ठरण्यासाठी अंकिता रैना (Ankita Raina) , कारमानकौर थांडी (Karman Kaur Thandi) व प्रांजला यादलापल्ली (Pranjala Yadlapalli) या प्रयत्न करणार आहेत. ही पात्रता स्पर्धा 10 ते 13 जानेवारीदरम्यान दुबईत खेळली जाणार आहे.

पात्रता स्पर्धेच्या सलामी सामन्यांमध्ये अंकिता रैनाची लढत इसाबेला शिनिकोव्हा, कारमान थांडीची लढत ज्युलिया ग्राभेर हिच्याशी तर प्रांजला यादलापल्लीची लढत सामंथा मरे शरण हिच्याशी होणार आहे.

दरम्यान, पुरुषांमध्ये सुमित नागलला (Sumit Nagal) वाईल्ड कार्डद्वारे ऑस्ट्रेलियन ओपन 2021 पुरुष एकेरीच्या मेन ड्रॉमध्ये प्रवेश मिळाला आहे. आशिया प्रशांत भागासाठी असलेले एकमेव वाईल्ड कार्ड त्याला देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 8 फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. सुमीत नागल सध्या क्रमवारीत 136 व्या स्थानी आहे आणि या क्रमवारीआधारे तो पुरुष एकेरीसाठी पात्र ठरत नव्हता. सुमीतची ही पहिलीच ऑस्ट्रेलियन ओपन असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER