गंगाखेड येथे मोबाईल शॉपी फोडणारे तिघे गजाआड

२५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद :- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील मोबाईल शॉपी फोडून विविध कंपन्याचे महागडे मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना औरंगाबादच्या ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी सिल्लोड ते भोकरदन रोडवर करण्यात आली.

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियंका चर्तुवेदी, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव पाटील, अनंत गिते चर्चेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबर खान हमीद खान (वय ३०, रा. पावरवाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक), अफसर खान हबीब खान (वय २६, ,रा. महात्मा फुले हायस्कूल जवळ, परभणी, ह. मु. पावरवाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक), सय्यद हुसेन सय्यद हबीब (रा. शब्बीर नगर, ता.मालेगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांनी मिळून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे असलेली मोबाईल शॉपी फोडून विविध कंपन्यांचे ६३ मोबाईल, एक लॅपटॉप व रोख रक्कम, चार चाकी गाडी, असा एकूण २५ लाख ५० हजार १६६ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक दुलत, सिल्लोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोकडे, उपनिरीक्षक बालाजी ढगारे, जमादार पंडित फुले, संजय आगे, कृष्णा दूबाले,सुभाष आगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.