जंगलातील आग विझवताना तीन वनमजूर दगावले

Maharashtra Today

गोंदिया :- नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील (Nagzira Sanctuary and Tiger Project) जंगलात लागलेली आग विझवताना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू (Three forest laborers Die) झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. दोन मजूर गंभीररीत्या जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता ही दुर्घटना घडली.

सचिन अशोक श्रीरंगे (२२ वर्षे) कोसमतोंडी, राकेश युवराज मडावी (२४ वर्षे) थाटेझरी, रेकचंद गोपीचंद राणे (४५ वर्षे) धानोरी अशी मरण पावलेल्या मजुरांची नावे आहेत. जखमींमध्ये विजय तिजाब मरस्कोल्हे (४२ वर्षे) थाटेझरी, राजेश शामराव हराम (२५ वर्षे) व एक गार्ड कानगुले (२७ वर्षे) यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button