ब्रिस्बेनमध्ये तीन दिवस लॉकडाऊन, ऑस्ट्रेलियाविरुध्दची चौथी कसोटी धोक्यात

Brisbane Lockdown - Team India

भारत (India) आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या (Australia) चौथ्या कसोटी (Fourth Test) सामन्याचे ठिकाण असलेल्या ब्रिस्बेन (Brisbane) येथे कोरोनासाठी खबरदारी म्हणून तीन दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आले आहे. त्याच्या काही तास आधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्र लिहून ब्रिस्बेनमधील कडक क्वारंटीनमधुन भारतीय संघाला काही निर्बंध शिथील न केल्यास ब्रिस्बेन कसोटीत भारताचे खेळणे अवघड असल्याचे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे या सामन्याबद्दल अनिश्चितता वाढली आहे. ब्रिस्बेन शहर हे क्वीन्सलँडची राजधानी असून तेथे 15 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना नियोजीत आहे. मात्र या ताज्या घडामोडींनी क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरील (Cricket Australia) अडचणी वाढल्या आहेत.

ब्रिटनमधील (Britain) कोरोनाच्या (Corona) नव्या स्ट्रेनने एकाहॉटेलातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने ब्रिस्बेनमध्ये नवे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे भारताचा विरोध दूर करत ब्रिस्बेनला चौथा कसोटी सामना आयोजित करण्याच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.

बीसीसीआयने गुरुवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला लिहिलेल्या पत्रात म्हटलेय की, या दौऱ्याच्या सुरुवातीला मान्य केल्याप्रमाणे भारतीय संघाने आयसोलेशनची सर्व प्रक्रिया मान्य केल्याप्रमाणे पाळली आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडूंना सामान्य ऑस्ट्रेलियन्सप्रमाणेच क्वारंटीनमध्ये सवलत मिळावी, त्यांना फाईव्ह स्टार जेलप्रमाणे हॉटेलात बंदिस्त ठेवू नये अशी मागणी केली आहे. मात्र ब्रिस्बेनमधील कडक नियमांनुसार भारतीय संघाला हॉटेल आणि मैदान एवढेच फिरता येणार आहे.

यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलेय की, क्वीन्सलँड सरकारशी केलेल्या चर्चेनुसार भारतीय खेळाडूंना व सहकाऱ्यांना खेळ व सरावाशिवायच्या वेळात त्यांची निवासव्यवस्था असलेल्या हॉटेलात एकत्र येण्यास परवानगी देण्यात आली आहे पण बीसीसीआयला या संदर्भात लेखी हमी हवी आहे असे समजते.

या पार्श्वभूमीवर ब्रिस्बेनला सामना झाला नाही तर सिडनी येथेच चौथा कसोटी सामना खेळला जाईल अशी चिन्हे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER