सात महिन्यात तीन कोटी नवी जनधन खाती

Jandhan accounts.jpg

नवी दिल्ली : कोरोना संकट (Corona Crises) उद्भवल्यापासून म्हणजे १ एप्रिलपासून आतापर्यंत तीन कोटी जनधन खाती (Jandhan accounts) उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यात ११ हजार ६० कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचेही एसबीआय रिसर्चने अहवालात नमूद केले आहे. गतवर्षी याच काळात १.९ जनधन खाती उघडण्यात आली होती. त्यात ७ हजार ८५७ कोटी रुपये जमा करण्यात आले होते.

कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज जाहिर केले होते. या पॅकेजअंतर्गत गरीब वर्गातील महिलांच्या बँक खात्यात पाचशे रुपये वर्ग करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यामुळे कोरोना काळात जनधन खाते काढण्यात महिला वर्ग आघाडीवर होता. एप्रिल महिन्यात जनधन खात्यात ३४०० कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतरच्या पुढील महिन्यामध्ये यात घसरण होत गेली. तर सप्टेंबर महिन्यात जनधन खात्यांमध्ये ३ हजार १६८ कोटी रुपये जमा झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER