महाविकास आघाडी सरकारला बसले हे ‘तीन मोठे धक्के’! आघाडीची होतीये का राजकीय दमछाक?

politics - Maharastra Today

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्वतःची चौकशी व्हावी अशी मागणी केलीये. मुख्यमंत्री ठाकरेंना लिहलेल्या पत्रात त्यांनी ही मागणी केलीये. राज्यातली कायदा आणि सुवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडं असते त्या गृहमंत्र्यांनी स्वतःच्या चौकशीची केलेल्या मागणी मुळं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. यामुळं महाविकास आघाडी बॅकफुटवर गेल्याचं चित्र निर्माण झालंय. महाविकास आघाडीला वाझे-परमबीर प्रकरणात एका पाठोपाठ तीन धक्के बसलेत ज्यातून सावरण कठीण बनल्याचं, राजकीय विश्लेषकांचं म्हणनं आहे.

सचिन वाझेवर UAPA

अंबानींच्या घराबाहेर स्फोटक भरलेली गाडी ठेवल्या प्रकरणी एन. आय. ए.नं निलंबित पोलिस अधिकारी सचिन वझेंवर दहशतवादी कारवाई प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. महाविकास आघाडीसाठी खास करुन शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. सचिन वझेंवर कारवाई करण्याची मागणी फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वझेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. आरोपानंतरही ती बराच वेळ पदावरती होते. १७ वर्षांपासून निलंबित असणाऱ्या वझेंना कोरोना काळातील बंदोबस्तासाठी पोलिस अधिकाऱ्यांची कमी पडत असल्याचं कारण देत त्यांना पुन्हा कर्तव्यावर रुजु करण्यात आलं होतं. मधल्या काळात त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता.

ज्या पोलिस अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याच काम महाविकास आघाडी करत होती त्यानं बऱ्याच गुन्हाची कबूली दिली. त्याच्यावर दहशवादी कारवाई प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. वझेंची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण होतंय.

राज्याच्या तपास यंत्रणेचे पितळ उघडं पडलं

सचिन वझेला एन. आय. एन.नं ताब्यात घेतल्यानंतर मोठे खुलासे करण्यात आले. १३ मार्चला सचिन वाझेला स्फोट प्रकरणात एन.आय.ए.नं ताब्यात घेतलं. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात हिरने यांच्या पत्नी ने वझेवर हत्येचा आरोप केला. २० मार्चला केंद्रीय गृहमंत्रायलायनं वझे प्रकरण दहशवादी विरोधी पथकाकडे वर्ग केलं.

२६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी दहशतवादाविरोधी चांगलीच कंबर कसली होती. देशात अव्वल दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई पोलिस दलातीलच अधिकाऱ्यावर दहशवादी कारवाईचा ठपका ठेवण्यात आल्यानं मुंबईसह राज्याच्या पोलिस यंत्रणेच्या प्रतिष्ठेला यामुळं ठेच पोहचणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात गृहमंत्र्यांच्या ताब्यात असणाऱ्या तपास यंत्रणांनी कोणत्याच प्रकारचा तपास केला नाही. तथ्य बाहेर काढले नाहीत. केंद्रीय तापास यंत्रणेंनी हे करुन दाखवलं. त्यामुळं महाविकास आघाडी आणि गृहमंत्र्यांच्या हेतूवर संशय निर्माण होत असल्याचं जाणकारांच म्हणनं आहे.

“…अनिल देशमुख हाजिर हो!”

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांनी गृहमंत्र्यांवर फक्त आरोप केले नाहीत, तर त्यांनी सर्वोच्च न्यायलयात धाव घेऊन गृहमंत्र्यांच्या सी.बी.आय. चौकशीची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली. आधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितलं. यासोबतच याचिकाकर्ते परमबीर सिंह यांनी पक्षकार म्हणून अनिल देशमुखांचं नाव का याचिकेत दाखल केला नाही? असा सवला केला.

पक्षकार म्हणून अनिल देशमुखांच नाव उच्च न्यायालायच्या याचिकेत परमबीर सिंहांनी दाखल केल्यास देशमुखांना सुनावणीसाठी हजर रहावं लागेल, उच्च न्यायालायसमोर बाजू मांडावी लागेल. गृहमंत्र्याना सर्वोच्च न्यायालायच्या सुनावणीला सामोरं जावं लागत असल्यामुळं महाविकास आघाडीसह वैयक्तिक देशमुखांच्या प्रतिमेलाही यामुळं तडा जाऊ शकतो.

…. तर राजीनामा द्यायला हरकत काय?

वाझे प्रकरण समोर आल्यापासूनच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता तर थेट मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावर काम केलेल्या अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केलेत. यामुळं डॅमेच कंट्रोलसाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, असं पत्र गृहमंत्र्यांनी लिहलंय. निष्पक्ष चौकशी व्हावी अशी जर गृहमंत्र्यांची इच्छा असेल तर त्यांनी पदउतार व्हावं, असा ही सुर आता राजकीय वर्तूळात उमटतो आहे. राज्याची पोलिस यंत्रणा गृहमंत्र्यांच्या ताब्यात असते. गुन्हेगाराला शासन करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असते. आता स्वतः गृहमंत्र्यांनीच स्वतःच्या चौकशीची केलेली मागणी म्हणजे गृहमंत्री म्हणून त्यांचं अपयश जाहीर करते. त्यामुळं देशमुखांनी पदउतार होऊनच चौकशीला सामोरं जावं, असं असं विरोधकांचं म्हणनं आहे.

या सर्व प्रकरणामुळं महाविकास आघाडीत अनेक संभ्रम निर्माण झाल्याच राजकीय विश्लेषकांचं म्हणनं असून काँग्रेसमधूनही अनेक नेते या प्रकरणावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांची भूमिका आता काय असेल? यावरच महाविकास आघाडीची आगामी दिशा अवलंबून असेल.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER