कळंबा कारागृहात टेनिस बॉल मधून गांजा पुरवणाऱ्या तिघांना अटक

Three arrested for supplying cannabis from tennis ball in Kalamba jail

कोल्हापूर :  कळंबा मध्यवर्ती कारागृहातील (Kalamba jail)मित्राला, कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरुन टेनिस बॉल (Tennis Ball) फेकून त्यातून गांजा पुरविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैभव विवेक कोठारी (२४), संदेश नितीन देशमुख (२०) आणि अमित सुनील पायगुडे (२५,तिघेही रा. बिबवेवाडी, जि. पुणे) या तिघाना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता,त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींचा मित्र व पुण्यातील गुंड सोनू शेख हा कळंबा कारागृहात कच्चा कैदी म्हणून आहे. त्याला गांजा पुरवण्यासाठी पुण्यातील बिबेवाडी इथे राहणारे त्याचे मित्र वैभव, संदेश व अमित हे कळंबा कारागृहाबाहेर संशयित हालचाली करताना काल पोलिसांना आढळले. त्यांच्या झडतीत तीन टेनिस बॉल आढळले. हे बॉल कापले असता, त्यात प्रत्येकी ५ ते १० ग्रॅम गांजा भरल्याचे समोर आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER