साडेअकरा लाखाची रोकड लुटल्याप्रकरणी तिघांना अटक

Three arrested for looting Rs 11.5 lakh cash

सांगली :- एलआयसीसह इतर हप्त्यांची वसूली करुन पैसे भरण्यासाठी निघालेल्या व्यक्तीला वाटेत गाठून तब्बल 11 लाख 62 हजारांची रोकड लुटणार्‍या तिघांना सांगली पोलीसांनी अटक केली आहे. ऑक्टोंबर 2019 मध्ये ही घटना आटपाडी तालुक्यातील करगणी येथे घडली होती. या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लावला असून दोघां लुटारुंकडून चार लाख दहा हजाराची रक्कम हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.

पोलीसांनी अटक केलेल्यांमध्ये धनराज उर्फ सोन्या सतीश पाटील (वय 25, रा.शिवाजी हौसींग सोसायटी, साखर कारखान्यासमोर, सांगली) , रोहित शशिकांत भगत (वय 19, रा. बिसूर, ता. मिरज) आणि लक्ष्मण मारुती सिंदगी (वय 23, साखरकारखाना वसाहत, सांगली ) आदींचा समावेश आहे. या लुटारुनी दि.7 ऑक्टोंबर 2019 रोजी पैसे भरण्यासाठी निघालेल्या मोहन सुखदेव शिंदे (वय 34, आटपाडी) या व्यक्तीला वाटेत आडवून लुटले होते. शिंदे हे एलआयसी, फिल्पकार्ड, इंन्स्टाकार्ड या कंपन्यांच्या रकमेची वसूली करुन करगणी येथील बँकेकडे पैसे भरण्यासाठी निघाले असताना हा प्रकार घडला होता. एकूण 11 लाख 62 हजार रुपयांची लुट झाल्याचा गुन्हा आटपाडी पोलीसात दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी स्वतंत्र पथक तयार केले होते. पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिदे, हवालदार बिरोबा नरळे, निलेश कदम, संदीप गुरव, सागर लवटे, संदीप नलवडे, संतोष गळवे, अनिल कोळेकर, शंकर पाटील आदींच्या पथकाने संशयीत लुटारुंचा शोध घेऊन मंगळवारी त्यांना आटपाडी पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER