मराठी ‘स्टेटस’ ठेवले म्हणून तिघांना अटक! बेळगावात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

बेळगाव : मोबाईलवर मराठी स्टेटस (Marathi status) ठेवले, या कारणावरून बेळगाव येथे कर्नाटक ग्रामीण पोलिसांनी तीन मराठी भाषक मुलांना अटक (Three arrested) केली! यासाठी कर्नाटक पोलिसांवर टीका होते आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि कानडी संघटनांमध्ये संघर्ष सुरू आहे. हे उल्लेखनीय.

निखिल केसरकर, विशाल छप्रे, दिगंबर डेळेकर या तीन मुलांनी त्यांच्या मोबाईलवर मराठी स्टेटस ठेवले होते. फक्त मराठी स्टेटस ठेवल्याचे कारण देत बेळगावातील ग्रामीण पोलिसांनी या तिन्ही तरुणांना अटक केली.

‘कन्नड रक्षण वेदिले’च्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर दुकानांवरील मराठी फलकांना काळे फासले. त्यावेळी हजर असलेल्या पोलिसांनी कन्नड कार्यकर्त्यांना रोखले नाही. आज मराठी मुलांनी मराठी ‘स्टेटस’ ठेवले म्हणून त्यांना पोलिसांनी अटक केली. या सर्व प्रकारामुळे येथील स्थानिक मराठी संघटना आणि तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER