कोव्हीड संदर्भात कोल्हापुरात साडेतीन हजार गुन्हे

Dr. Abhinav Deshmukh

कोल्हापूर : लॉकडाऊनपासून कोल्हापूरात ३० मार्च ते २७ मेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात कोविड संदर्भातील तीन हजार ९०० गुन्ह्यांची नोंद झाली. सुमारे ५५ लाख रुपये दंड आकारणी व आठ हजार ७१० वाहने जप्त केली आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत कलम १८८ नुसार गुन्हे नोंद झाले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस, आशावकर्स अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करण्याचे राज्यात २५४ घटना घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. कोल्हपुरातही आशा वर्कर्सवर हल्ला होण्याचे तीन घटना घडल्या. पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा १६६ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अमुक ठिकाणी गर्दी झाली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही याबाबत १०२९ तक्रारी फोनवरुन आल्या. पोलीसांनी दिलेल्या वॉटस्‌ ॲप नंबरवर ५६६ तक्रारी आल्या.

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १६६८ फोन आले. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी १०, हॉस्टेलमध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी दहा,स्थलांतरीत धान्य पुरवठ्यासाठी ६६, जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा- नऊ, दुकान बंद, किराणा आदीबाबत १५, सोशल डिस्टन्सिंगबाबत १०२९, पास मिळावा यासाठी९७, दारु आणि गुटका विक्री विरोधात ६९, घरमालकांच्या त्रासाबाबत आठ तर आवश्यक फोन नंबर मिळावा यासाठी १०६ फोन आले. महिलांवर अत्याचाराबाबत ५६ , जुगार १५ तर चोरीबाबत १० फोन आले. यासर्वांची दखल पोलीसांनी घेतली.

कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकवेळी पोलीसांनी कायद्याचा बडगा उगारण्याची वाट पाहू नये. स्वंस्फुर्तीने सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER