साडेसात कोटींच्या रक्तचंदनाची तस्करी; चेन्नईतील तिघांना अटक

Smmugling

मुंबई :- भारताबाहेर विक्रीसाठी आणलेल्या साडेसात कोटींचा रक्तचंदनाचा दीड हजार किलोचा साठा गुन्हे शाखेने जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष- ९ ने ही कारवाई केली असून हा साठा दक्षिण भारतातून मुंबईत आणण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : ९० लाख किंमतीच्या 9 किलो एमडीसह तिघांना अटक, राज्य दहशतवाद विरोधी…

या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय तस्करीचे मोठे रॅकेट गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष-९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मंगळवारी काही जण रक्तचंदनाचा साठा घेऊन मुंबईतील सांताक्रुझ परिसरात येणार असल्याची माहिती कक्ष-९ ला मिळाली.

त्यानुसार त्यांनी तापसणी करत दोन टेम्पो ताब्यात घेतले. त्यातून दीड हजार किलोचा साठा सपडला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी हा माल कोणाकडून व कसा आणला? याबाबत अधिक तपास सुरू आहे. असगर इस्माइल शेख (४९), अली शांताराम शेख (३२) आणि वाज़िद अब्बास अन्सारी (३२) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

ही बातमी पण वाचा : सलमान खानच्या नावाने फसवणूक