शिवसेनेविरुद्ध बोलणाऱ्या महिला खासदारावर अ‌ॅसिड फेकण्याची धमकी; सेनेच्या लेटरपॅडचा उपयोग !

Navneet Rana -Uddhav Thackeray

नवी दिल्ली : शिवसेनेवर (Shivsena) टीका करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. धमकीचे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर असल्यामुळे खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांनी याबाबत शिवसेनेने धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धमकीचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा राणा यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून नवनीत राणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर सतत टीका करत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीज बिल अशा अनेक मुद्यांवर त्यांनी सरकारवर टीका केली. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांना धमकीचे हे पत्र आले आहे. पत्रात त्यांच्यावर अ‌ॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे.

नवनीत राणा यांना आलेले धमकीचे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर असल्यामुळे राणा यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. पत्रात अर्वाच्य भाषेचा वापर करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER