भारतातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांकडून लसीसाठी धमक्या; आदर पूनावाला यांची माहिती

Adar Poonawala

लंडन :- भारतासाठी धक्कादायक बातमी आहे. जगातील सर्वांत मोठी लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा आदर पूनावाला यांनी भारतातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या धमक्यांमुळे आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये कोरोना लसीचे  उत्पादन करण्याबाबतचे संकेतही त्यांनी दिले आहे. ते आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पूनावाला जगातील सर्वांत  मोठे कोरोना लस उत्पादक आहेत.

आदर पूनावाला म्हणाले, “कॉल करणारांमध्ये भारतीय राज्यांतील मुख्यमंत्री, व्यापार संघटनांचे प्रमुख आणि अनेक प्रभावशाली उद्योग समूहांच्या प्रमुखांचा समावेश आहे. हे लोक फोनवरून कोविशिल्ड लसींचा तत्काळ पुरवठा करा, अशी मागणी करत आहेत. अशा प्रकारची मागणी धमकी म्हणणंही कमी ठरेल. त्यांचा आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आदर पूनावालांना केंद्राकडून वाय सुरक्षा (Y Security) देण्याची घोषणा

दरम्यान, आदर पूनावाला यांना सातत्याने मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच त्यांना वाय सुरक्षा व्यवस्था देण्याची घोषणा केली आहे. पुण्यातील सीरमचे संचालक प्रकाशकुमार सिंह यांनी १६ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून पूनावाला यांना संरक्षण देण्याची विनंती केली होती.  यानंतर केंद्राने त्यांना संरक्षण दिले. आता पूनावाला यांना संपूर्ण भारतात सीआरपीएफच्या जवानांकडून सुरक्षा पुरवली जाईल. सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोविड-१९ विरोधातील युद्ध लढत आहोत. मात्र, मागील काही काळापासून आदर पूनावाला यांना कोविशिल्डचा पुरवठा व्हावा यासाठी वेगवेगळ्या गटांकडून धमक्या येत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button