मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक

CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खासगी निवास्थान ‘मातोश्री’ (Matoshri) उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केल्याची माहिती मिळाली आहे. ‘दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकू’, अशी धमकी दिली होती.

याअगोदरही एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे दया नायक यांनी मोठी कारवाई केली होती. मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. नायक यांनी कोलकातामधून आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. ‘मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी 30 ऑगस्टला आली होती. त्यानंतर ‘वर्षा’ (Varsha) बंगला उडवून देण्याची धमकी मिळाली होती. आता तर आधी आकाशवाणी आमदार निवास उडवून देण्याची मुंबई पोलिसांना मिळाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्यानंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER