मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन; तरुणाला नागपुरातून अटक

Maharashtra Today

मुंबई :  मंत्रालयात काल बॉम्ब ठेवल्याचा (threatening-phone-call-bomb-mantralay) निनावी फोन आल्याने खळबळ उडाली. त्या फोनमधून एका व्यक्तीने मंत्रालयात बाॅम्ब असल्याची माहिती दिली. त्यानंतर मंत्रालयात असणाऱ्या सर्वांचीच धावाधाव झाली. त्या फोननंतर मुंबई पोलिसांच्या बाॅम्बशोधक पथकाने तातडीने मंत्रालयात धाव घेतली.

मंत्रालयाचा सर्व परिसर शोधून काढला; परंतु  बाॅम्बशोधक पथकाच्या हाती काहीच लागलं नाही. या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर हा फोन नागपूरहून आल्याचे समजले. सागर काशीनाथ मांढरे या तरुणानं हा फोन केल्याचे समोर आले .माहितीनुसार, नागपुरात  राहणाऱ्या सागर मांढरेला त्याच्या वेस्टर्न कोल फिल्डजवळ असलेल्या जमिनीचा सातबारा पाहिजे होता. त्यासाठी त्याने तहसीलदार , जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे सतत चक्रा मारल्या तरीदेखील त्याला सातबारा दिला गेला नाही.

त्याने याबद्दल मंत्रालयात तक्रारदेखील केली होती. त्यासोबत त्याने आत्मदहनाची धमकीदेखील दिली होती. त्यानंतर त्याने मंत्रालयात बाॅम्ब असल्याची अफवा पसरवली. या फोनचा तपास मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिसांकडे देण्यात आला. त्यांच्या तपासावरून हा फोन नागपूरमधून आल्याचे कळाले. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या मदतीनं अखेर सागर मांढरेला ताब्यात घेण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button